Wed, Mar 27, 2019 02:28होमपेज › Belgaon › ‘लिंगायत धर्म’ मागणीवर नेते ठाम

‘लिंगायत धर्म’ मागणीवर नेते ठाम

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 05 2018 11:31PMबंगळूर : प्रतिनिधी     

वीरशैव? लिंगायत स्वतंत्र धर्माबाबत न्या.नागमोहन दास यांच्या नेतृत्वातील समितीने अल्पसंख्याक आयोगाकडे सादर केलेला अहवाल अखिल भारतीय वीरशैव महासभेने मान्य केलेला नाही. लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी करणारा गट आपल्या मागणीवर ठाम  आहे. मात्र, पूर्ततेसाठी सरकारवर कोणत्याही रितीने दबाव न आणण्याचे ठरविले आहे.

वीरशैव? लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यासंबंधी तज्ज्ञ समितीने दिलेला निर्वाळा मान्य करण्याची दोन्ही गटांची तयारी नाही. मात्र, यासंदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेते त्यावरून पुढील पाऊल टाकण्याचे लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी करण्याच्या नेतेमंडळींनी ठरविले आहे.

दरम्यान, स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यासाठी अभ्यास चालविलेल्या नागमोहनदास नेतृत्वातील समितीने अल्पसंख्याक आयोगाकडे अहवाल पाठविला आहे. हा अहवाल सरकारला मिळालेला नाही. तो उपलब्ध झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल. अहवाल सादर करण्याची सरकारडून घाई करण्यात येत नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धराम्या यांनी हुबळी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.

कोणताही निर्णय कायदेशीरपणे घेण्यात यावा. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवून घेण्याच्या विचाराशी आम्ही ठाम आहोत, असे माजीमंत्री लिंगायत नेते बसवराज होरट्टी यानी म्हटले आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना समाजानेच धडा शिकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. सत्तारुढ सरकारने राजकीय लाभासाठी खेळी करू नये, असे लिंगायत महासभेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एन.तिप्पण्णा यांनी म्हटले आहे.

वीरशैव धर्माची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी समजावून न घेता तज्ज्ञ  समितीने अल्पसंख्याक आयोगाकडे सादर केलेला अहवाल म्हणजे बेकायदेशीर कृती असल्याचे श्री रंभापुरी पीठाचेे प्रसन्न रेणूक, डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य यांनी म्हटले आहे.

निवृत्त न्यायमूर्ती नागमोहन दास नेतृत्वातील तज्ज्ञ समितीतील सदस्य पहिल्यापासूनच एका गटाचे म्हणून ओळखले जातात. 6 महिने वेळ व्यर्थ  घालवून उर्वरित दोन महिन्यांत अहवाल तयार करून अल्पसंख्याक आयोगाला अहवाल दिला असून हे पूर्वनियोजित तंत्र आहे. तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस कोणीही मान्य करणे शक्य नाही, असेही वीरसोमेश्‍वर शिवाचार्य यांनी म्हटले आहे.सद्य:स्थिती काय?सध्या लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग मानला जातो. या समुदायाची नोंदही हिंदू-लिंगायत अशीच केली जाते.