Thu, Jan 17, 2019 12:25होमपेज › Belgaon › कर्जबाजारी शेतकर्‍याची चंदनहोसुरात आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची चंदनहोसुरात आत्महत्या

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

बँकेतून काढलेले पीककर्ज व गावातील काही जणांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने कीटकनाशक प्राशन करून शेतकर्‍याने आत्महत्या केली. रविवारी चंदनहोसूर येथे ही घटना घडली. सिद्धाप्पा परप्पा बसरीकट्टी (वय 52, रा. कलमेश्‍वर गल्‍ली, चंदन होसूर, ता. बेळगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. 

सिद्धाप्पा यांनी बसरीकट्टी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून 60 हजारांचे पीककर्ज घेतले होते. तसेच गावातील काहीजणांकडून पैसे घेतले होते. सदर कर्ज  फेडणे त्याला अशक्य झाले होते. यामुळे निराश सिद्धाप्पाने रविवारी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना लागलीच इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सदर घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.