Mon, Feb 18, 2019 18:16होमपेज › Belgaon › बेळगावात बीएसएफ जवानाची आत्महत्या

बेळगावात बीएसएफ जवानाची आत्महत्या

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:38AMबेळगाव ः प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या बीएसएफच्या जवानाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वा. घडली. शामसिंग (वय 42, रा. उत्तर प्रदेश) असे मृत जवानाचे नाव आहे. घटनेची नोंद एपीएमसी पोलिस स्थानकात झाली आहे.

बीएसएफच्या 79 बटालियनच्या तुकडीतील जवानांची चिक्कोडी येथे नेमणूक करण्यात आली आहे. शामसिंगला पोटाचा त्रास जाणवत असल्याने त्याला 24 रोजी चिकोडी येथील इस्पितळात दाखल केले होते. अधिक उपचारांसाठी त्याला 25 रोजी येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इस्पितळाच्या पाचव्या मजल्यावर असणार्‍या मार्कंडेय विभागात आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्रास सहन न झाल्याने त्याने शनिवारी पाचव्या मजल्याच्या खिडकीतून उडी टाकली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याचा त्याचा मृत्यू झाला. 

घटनास्थळी उपायुक्त सीमा लाटकर , एपीएमसी पोलिस निरीक्षक रमेश हानापूर यांनी पाहणी करून माहिती घेतली. बीएसएफ कमांडन्ट व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन एपीएमसी पोलिस स्थानकात घटनेची नोंद केली आहे. जवानाचा मृतदेह गोवामार्गे विमानातून उत्तर प्रदेशला पाठविण्यात आला.