Sat, Nov 17, 2018 08:44होमपेज › Belgaon › लखनापूर येथे गायीचे डोहाळ जेवण 

लखनापूर येथे गायीचे डोहाळ जेवण 

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 8:28PMअकोळ: वार्ताहर

लखनापूर येथे काकासो लाटकर यांच्या खिलार नावाच्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. लाटकर कुटुंबियांनी पाहुणे, नातेवाईक व मित्र-मंडळींना बोलावून गायीचे डोहाळ जेवण कार्यक्रम आयोजित केला होता.

गायीला सजवून महिलांनी पूजन केले. काशिबाई लाटकर, सुशिला मगदूम, जयश्री लाटकर यांच्यासह महिलांच्या हस्ते पूजा करुन गायीला ओवाळून ओटी भरण्यात आली. गायीच्या डोहाळ जेवण कार्यक्रमानिमित्त सुमारे 150 नागरिकांना जेवण देण्यात आले. कार्यक्रमास मान्यवर, लाटकर कुटूंबीय व नातेवाईक उपस्थित होते.