Sat, Nov 17, 2018 18:35होमपेज › Belgaon › गोहत्या बंदीची ग्वाही हा निवडणूक स्टंट 

गोहत्या बंदीची ग्वाही हा निवडणूक स्टंट 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सत्तेवर आल्यास कर्नाटकात गोहत्या बंदी करण्याचा भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा दावा म्हणजे शुद्ध निवडणूक स्टंट असल्याची टीका गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

रेड्डी म्हणाले, भाजप सत्ताकाळात बीफ निर्यातीत 14 टक्क्यांनी वाढ झाली असून भाजपची सत्ता असलेले महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशही बीफ निर्यात करणारी प्रमुख राज्ये आहेत. भारत हा ब्राझीलच्या खालोखाल गोमांस निर्यात करणारा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. भाजपची सत्ता असलेल्या गोवा राज्यात दररोज 30 ते 50 टन बीफ खाल्ले जाते. किरण रिजिजू यांनी तर आपण स्वत:च बीफ खातो अन् आपल्याला यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा दावा केला असल्याचे नमूद करून इशान्येकडील सत्ता स्थापन केलेल्या राज्यात मोदी बीफच्या वापरावर बंदी आणू शकणार आहेत काय, असा सवालही रामलिंग रेड्डी यांनी केला. 


  •