Mon, Jan 21, 2019 09:46होमपेज › Belgaon › निपाणी : तवंदी घाटात कंटेनर २०० फूट दरीत कोसळला

निपाणी : तवंदी घाटात कंटेनर २०० फूट दरीत कोसळला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्‍ट्रीय महामार्गावर सेलमहून पुण्याकडे निघालेला कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने २०० फूट दरीत कोसळला. हा अपघात रविवारी पहाटे ४ वा.च्या सुमारास तवंदी घाट उतारावरील दुसर्‍या वळणावर झाला. 

६ चाकी असणार्‍या कंटेनरचे चालकाच्या बाजूचे दार उघडल्याने चालकाने प्रसंगावधान राखून उडी घेतली त्यामुळे तो बचावला. परशराम फकीरप्‍पा डफळी (वय ३०) रा. हुबळी असे चालकाचे नाव आहे. तो जखमी असून निपाणीतील सरकारी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्‍केरी व निपाणी शहरचे फौजदार शशिकांत वर्मा यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.