होमपेज › Belgaon › खूनसत्रामुळे कर्नाटक काँग्रेसमुक्तीकडे

खूनसत्रामुळे कर्नाटक काँग्रेसमुक्तीकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

म्हैसूर : प्रतिनिधी

राज्यामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे खून झाल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. कर्नाटक काँग्रेसमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. 

सध्या अमित शहा हे म्हैसूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. आपल्या दौर्‍यामध्ये त्यांनी समाजातील अनेक घटकांशी संपर्क साधून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. म्हैसूरमध्ये झालेल्या सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, सिद्धरामय्यांच्या कारकिर्दीत 23 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांचे खून झालेले आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या सरकारला घरघर लागलेली आहे.  

भाजपचा कार्यकर्ता राजू याचा अलीकडेच समाजकंटकांनी खून केला होता. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शहा यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली. 


  •