होमपेज › Belgaon › तक्रारदार महिलेलाच ठोठावला दंड!

तक्रारदार महिलेलाच ठोठावला दंड!

Published On: Jun 29 2018 12:08AM | Last Updated: Jun 28 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी

येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुविधांची कमतरता असून देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा खटला बेळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण न्यायालयामध्ये दाखल झाला होता. तो  ग्राहक संरक्षण न्यायालयाने फेटाळून तक्रारदारालाच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

शिवाजीनगर येथील स्टर्लिंग निवासी अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या वंदना गुरव यांनी आपल्या फ्लॅटमध्ये सुविधांचा  अभाव असून स्टर्लिंगनिवासी मालक संघटनेने देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा खटला दाखल केला होता. सदर महिलेने तक्रारीत व्यवस्थित पाणीपुरवठा केला जात नाही. पाईपमधून सुरू झालेल्या गळत्या बंद करण्यात आलेल्या नाहीत. या उणिवा असल्याबद्दल आपल्याला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली होती. 

सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सदर महिलेने देखभालीची रक्कम संघटनेकडे नियमितपणे भरलेली नाही, सदर तक्रार खोटी असून ती फेटाळण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. 

ग्राहक संरक्षण न्यायालयाच्या अध्यक्षा सुनीता यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संघटनेने कोणत्याही सुविधा देण्यासाठी दुर्लक्ष केलेले नाही.हे आढळून आल्यानंतर सदर खटला फेटाळून लावला. तक्रारदार वंदना गुरव यांना दोन हजार रुपये स्ट्रलिर्ंग निवासी मालक संघटनेला 30 दिवसांमध्ये देण्याचा आदेश बजावला.