Thu, Jun 20, 2019 06:34होमपेज › Belgaon › समितीने संधी दिल्यास ‘उत्तर’मधून लढू

समितीने संधी दिल्यास ‘उत्तर’मधून लढू

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समिती व मराठी भाषिकांच्या सहकार्यामुळे 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण निवडून आलो. त्यानंतर पाच वर्षांत अनेक विकासकामे राबविली. यामध्ये नगरसेवकांचे मिळालेली सहकार्य महत्त्वाचे असून आगामी विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीने संधी दिल्यास आपण उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू, अशी माहिती आ. संभाजी पाटील यांनी दिली.

मराठी नगरसेवकांची रविवारी बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. म. ए. समितीने दिलेल्या उमेदवाराला सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील पाच वर्षांत 32 नगरसेवक एकत्र राहिले. या माध्यमातून चार महापौर व पाच उपमहापौर निवडून आणण्यात आले. यामध्ये मराठी भाषिकांचे चांगले सहकार्य मिळाल्याचे नगरसेवकांनी सांगितले. आ. संभाजी पाटील यांनी नगरसेवकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. यावेळी मराठी नगरसेवक उपस्थित होते.