Wed, Sep 26, 2018 08:53होमपेज › Belgaon › स्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्यासाठी विषप्राशन करू : खासदार हुक्‍केरी (व्‍हिडिओ)

स्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्यासाठी विषप्राशन करू : खासदार हुक्‍केरी (व्‍हिडिओ)

Published On: Feb 06 2018 7:23PM | Last Updated: Feb 06 2018 7:04PM
बेळगाव : प्रतिनिधी

चिकोडी जिल्‍ह्याच्या निर्मितीसाठी राजीनाम्यासह विषप्राशन करण्याची तयारी असल्याचा इशारा खासदार प्रकाश हुक्‍केरी यांनी दिला आहे. गेल्‍या  वीस वर्षापासून बेळगाव जिल्‍ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्‍ह्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी होत आहे. सोमवार दि. ५ पासून चिकोडी येथे हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खासदार प्रकाश हुक्‍केरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. 

चिकोडी जिल्ह्याची निर्मिती व्‍हावी म्‍हणून गेल्या वीस वर्षापासून मागणी होत आहे. १९९७ मध्ये तत्‍कालीन मुख्यमंत्री जे. एच. पाटील यांनी चिकोडी जिल्‍ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले होते. स्‍वतंत्र चिकोडी जिल्‍ह्याची निर्मिती करण्यात यावी ही मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. म्‍हणून जिल्‍ह्यासाठी राजीनाम्यासह विषप्राशन करण्याची तयारी असल्याचा इशारा खासदार हुक्‍केरी यांनी दिला आहे.