Sun, Mar 24, 2019 06:43होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्यासाठी सोमवारी बैठक

चिकोडी जिल्ह्यासाठी सोमवारी बैठक

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 1:15AMबेळगाव : प्रतिनिधी

चिकोडी जिल्ह्याविषयी निर्णय घेण्यासाठी येत्या सोमवारी 19 रोजी जिल्ह्यातील सार्‍या लोकप्रतिनिधींची बंगळुरात बैठक घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली आहे. तशी माहिती खा. प्रकाश हुक्केरी यांनी दिली. ते म्हणाले, आपण बंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेऊन त्यांना चिकोडी जिल्ह्याचा निर्णय घेण्याची विनंती केली. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बंगळूर येथे 19 रोजी दुपारी 1 वा. बेळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व राज्यसभा सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीत जिल्ह्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. गुरुवारी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली गोकाकच्या शिष्टमंडळाने गोकाक जिल्हा वेगळा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे चिक्कोडी स्वतंत्र जिल्हा करायचाच झाल्यास गोकाकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे.

Tags : belgaon, belgaon news, chikodi district Representatives, Meeting, Siddaramaiah, Prakash Hukkeri,