Thu, May 23, 2019 14:24
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ‘दूधगंगा-कृष्णा’च्या अध्यक्षपदी अमित कोरे

‘दूधगंगा-कृष्णा’च्या अध्यक्षपदी अमित कोरे

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 10:57PMचिकोडी/अंकली : प्रतिनिधी

येथील श्री दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना नियमितच्या अध्यक्षपदी अमित प्रभाकर कोरे यांची दुसर्‍यांदा फेरनिवड तर उपाध्यक्षपदी सुभाष नेमण्णा कात्राळे यांची बिनविरोध निवड झाली. सोमवारी  कारखाना कार्यस्थळावर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक, खा. डॉ. प्रभाकर कोरे, संचालक आ. महांतेश कवटगीमठ यांच्यासह संचालक अण्णासाहेब  जोल्ले, अजित देसाई, बाळगौडा रेंदाळे, भरतेश बनवणे, चेतन पाटील, महावीर मिर्जे, मल्लाप्पा म्हैशाळे, मल्लिकार्जुन कोरे, परसगौडा पाटील, रामचंद्र निशानदार, रोहन ऊर्फ संदीप पाटील, तात्यासाहेब काटे, नंदकुमार नाशिपुडी आदी उपस्थित होते. निवडीनंतर सभासद व समर्थकांनी दोघांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.