Mon, Jan 21, 2019 17:48होमपेज › Belgaon › पत्रकार हत्या; मिरजेत शार्पशूटरला अटक

पत्रकार हत्या; मिरजेत शार्पशूटरला अटक

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 12 2017 1:10AM

बुकमार्क करा

चिकोडी ः प्रतिनिधी

पत्रकार रवी बेळेगेरे याने आपला सहकारी सुनील हेग्गरवळ्ळीच्या खुनाची सुपारी दिल्याच्या कटामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून गुन्हे अन्वेषण पोलिसांनी सोमवारी शार्पशूटर विजू बडिगेर याला मिरज रेल्वे स्थानकावरून अटक केली. तसेच पोलिसांनी विजापूर येथील पत्रकार मलगोंड यांचीही कसून चौकशी चालविली आहे.  आज अटक केलेला विजू बडिगेर हा भीमा काटावरील सुपारी किलर शशिधर मुंडेवाडी याचा जावई आहे. बंगळूर पोलिसांनी विजूला अटक केल्यानंतर त्याच्याकडून शशी मुंडेवाडी तसेच रवी बेळेगेरे याच्याबद्दल चौकशी चालविली आहे.