होमपेज › Belgaon › ‘शिवाजी महाराज की जय’ला करवेचा विरोध

‘शिवाजी महाराज की जय’ला करवेचा विरोध

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:49AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

करवे अध्यक्ष नारायण गौडा यांनी छ.शिवाजी महाराजांच्या नावाने दिल्या जाणार्‍या घोषणेला विरोध दर्शवून अकलेचे तारे तोडले आहेत. महापुरुषांच्या नावाने केल्या जाणार्‍या जय घोषाला विरोध करुन राष्ट्र पुरुषाचा अपमान केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शिवपे्रमींतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. करवेचे अध्यक्ष नारायण गौडा यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने दिल्या जाणार्‍या जय घोषाला विरोध करुन देशाचा अपमान केला आहे. हा अपमान केवळ मराठा समाजाचा अथवा महाराष्ट्राचा अवमान नसून  देशाचा अवमान आहे. 

एका राष्ट्रविराच्या विरोधात अपमान कारक वक्‍तव्य करुन हिंदू समाजाच्या भावन दुखावण्याचा प्रकार करवेच्या नेत्यांनी केला आहे. शिवाजी महाराज की जय  अशी घोषना द्याची नाही. असे वक्‍तव्य करुन शिवप्रेमींच्या भावनाना ठेच पोहचविण्याचे काम केले आहे. अशा प्रकारे वक्‍तव्य करणार्‍या करवेचे नेते नारायण गौडा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमीं तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देउन केली आहे.  

यावेळी अ‍ॅड. सुधिर चव्हाण, अ‍ॅड. अमर येळूरकर, सुनिल बाळेकूंद्री, सुरज कणबरकर, अप्पासाहेब पुजारी, नारायण किटवाडकर आदी उपस्थित होते.