Wed, Jun 26, 2019 17:42होमपेज › Belgaon › जिल्हाधिकार्‍यांविरोधात खटला दाखल

जिल्हाधिकार्‍यांविरोधात खटला दाखल

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:50AMबेळगाव: प्रतिनिधी

कामगारांची थकबाकी त्यांना हस्तांतरित करण्याच्या कामात दिरंगाई व दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून अ‍ॅड. राम आपटे यांनी जिल्हा प्रशासना विरोधात सोमवारी (दि.28) विविध कमलाखाली खटला दाखल केला आहे. त्यांना 11 जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मालकांनी कामगारांची  थकविलेली रक्कम जिल्हा प्रशासनाने त्यांना वसूल करून देणे गरजेचे असते. न्यायालयाने आदेश देऊनही जिल्हा प्रशासनाने आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे. यामुळे कामगारांना त्यांचे पैसे अजून मिळाले नाही. 

यासंबंधी जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला, निवासी जिल्हाधिकारी,  तहसीलदार मंजुळा नाईक, महसूल वसुली विभागाचे शिरेस्तेदार तंगोळी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यांना 11 जूनपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. आपटे यांनी दिली. त्यांच्याविरुद्द भादंवि आणि सहकलम 162, 164, 165, 168 आणि कर्नाटक भू महसूल कायदा 1964 कलम 190 खाली खटला दाखल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला अनेकवेळा सांगूनही त्यांचे दुर्लक्षच होत आहे. अशा खटल्यात मालक वर्गाकडून किमान 1 कोटी रुपये येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.