Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Belgaon › बर्निंग कारचा थरार

बर्निंग कारचा थरार

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:37AMबेळगाव : प्रतिनिधी

धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार  गुरुवारी सकाळी चन्‍नम्मा चौकात घडला. पण, आगीची कल्पना वेळीच आल्याने सहा जणांचे कुटुंब तातडीने कारबाहेर पडल्याने बचावले. अग्‍निशमन दलाने आग विझवली, पण तोपर्यंत कार खाक झाली होती.

कोल्हापूर येथील परशुराम कागलकर हे बेळगाव येथील नातलगांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते, पण चन्‍नम्मा चौकात कार बंद पडली. काही वेळानंतर कार पुन्हा सुरू झाली. पण, काही अंतरावर जाताच कारच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे दिसून आले. त्याबरोबर चालकासह सहाही जण तातडीने कारमधून बाहेर पडले. इतक्यात कारच्या मागील बाजूने आगीचे लोळ उठले आणि संपूर्ण कारने एकदम पेट घेतला. यामुळे एकच खळबळ उडाली. नेहमीच गजबजलेल्या या भागात कारला लागलेली आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

आगीचे नेमके कारण गुलदस्त्यात?

आगीचे नेमके कारण  गुलदस्त्यात आहे. मात्र, गॅस सिलिंडर हे कारण असू शकते. सामान्यपणे गॅसवर चालणार्‍या कारमध्ये गॅस सिलिंडर मागच्या बाजूला बसवले जाते. या कारला आगही मागच्या बाजूनेच लागली.