Fri, Apr 26, 2019 18:15होमपेज › Belgaon › महामेळाव्याचा प्रचार युद्धपातळीवर

महामेळाव्याचा प्रचार युद्धपातळीवर

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 10 2018 11:27PMबेळगाव : प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री, खा. शरद पवार यांच्या सभेचा प्रचार युद्धपातळीवर सुरु आहे. प्रचाराला अजून धार देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृती बैठका घ्याव्या. जाहीर सभेची पत्रके प्रत्येकाने वाटावी. बेळगावबरोबर कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी ठिकाणचे कार्यकर्ते या सभेत सहभागी व्हावे याची दक्षता घ्यावी. कार्यकत्यांनी रात्रंदिवस सभेसाठी योगदान द्यावे, आदी विषयासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. 

तालुका म. ए. समितीची कॉलेज रोडवरील कार्यालयात शनिवारी (दि.10) बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. माजी आ. मनोहर किणेकर, एस. एल. चौगुले व्यासपीठावर होते.

यावेळी बोलाताना माजी आ. किणेकर म्हणाले, 31 मार्चला होणार्‍या शरद पवार यांच्या सभेच्या जागृतीला गती देणे गरजेचे आहे. यासाठी ग्राम पंचायतनुसार जागृती कमिटीची नावे येत आहेत. त्या त्या भागात बैठका घेऊन जागृती करा. काही कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून देखील जागृती करावी. 

निंगोजी हुद्दार म्हणाले, महिला आघाडी, युवा आघाडी व समितीच्या कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सभेत सर्वात जास्त कार्यकर्ते येतील याकडे लक्ष द्यावे. बेळगाव शहर, तालुका, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या भागातील कार्यकर्त्यांना सामावून घेणे गरजेचे आहे. यासाठी वातावरण निर्मीती गरजेची आहे. 

रामचंद्र मोगदेकर म्हणाले, यापूर्वी 1986 साली शरद पवारांची मोठी सभा येथे झाली होती. 31 मार्चला होणार्‍या समितीच्या महामेळाव्याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होणार आहे. महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. 

यावेळी जि. प. सदस्य सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, ता.पं.सदस्य रावजी पाटील, आप्पासाहेब किर्तने, नारायण कदम, मिरा काकतकर, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, महेश जुवेकर, अ‍ॅड. शाम पाटील, दत्ता उघाडे, राजु किणेकर, मनोहर होसुरकर, एल. आय. पाटील, प्रेमा मोरे, मोनापा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित 
होते.