Thu, Jun 20, 2019 07:20होमपेज › Belgaon › प्रभाग ५७ मध्ये फेरनिवडणूक

प्रभाग ५७ मध्ये फेरनिवडणूक

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 11:20PMबेळगाव : प्रतिनिधी

नगरसेवक भैरगौडा पाटील यांनी आपल्या जातीचे प्रमाणपत्र बनावट दिल्याचे सिद्ध झाल्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांची निवड रद्दबातल ठरवली असून, महिनाभरात पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. भैरगौडा 2013 साली प्रभाग क्र. 57 मधून निवडून आले होते. त्यांच्या निवडीला  प्रतिस्पर्धी उमेदवार सुधीर गड्डे यांनी  आव्हान दिले होते. 

7 मार्च 2013 रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भैरगौडा पाटील विजयी ठरले. पण त्यांनी उमेदवारी अर्जासोबत आपल्या जातीचे बनावट प्रमाणपण जोडल्याची तक्रार गड्डे यांनी सुरवातील बेळगाव जिल्हा मुख्यसत्र न्यायालयात दाखल केली. 

न्यायालयाने सुनावणी करून जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे मान्य केले व निवडणूक रद्दबातल ठरवून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. मात्र, या निकालावर भैरगौडा पाटील यांनी धारवाड उच्च न्यायालयामधून स्थगितीचा आदेश मिळवला होता.

उच्च न्यायालाने 2016 मध्ये जिल्हा न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देऊन नगरसेवक म्हणून भैरगौडा यांना कामकाजात भाग घेण्याची मुभा दिली, पण मतदानाचा अधिकार दिला नव्हता.