Sat, Sep 22, 2018 10:38होमपेज › Belgaon › होनग्यानजीक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

होनग्यानजीक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:10AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावर होनग्यानजीक  बुधवारी दुपारी रस्त्याशेजारी दुचाकी घेऊन थांबलेल्या श्रीनिवास शिवराय कोळी (वय 22, रा. मारुती गल्ली, काकती) याला भरधाव बसने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या श्रीनिवासचा उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास होनग्यानजीकच्या रस्त्याशेजारी दु. 12 वा. आपली दुचाकी घेऊन थांबला होता. मागून आलेल्या भरधाव बसने श्रीनिवास आणि दुचाकीला धडक दिली. यामध्ये श्रीनिवास गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

उपचार सुरू असताना सायंकाळी 5 वा. त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची काकती पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला.