Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Belgaon › बस पास वितरण आजपासून सुरू

बस पास वितरण आजपासून सुरू

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:40AMबेळगाव : प्रतिनिधी

बस पास वितरणाला गुरुवारी, 7 जूनपासून सुरुवात होणार आहे. बेळगाव विभागात पहिल्या टप्प्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास वितरण होणार आहे. त्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाने शुल्क आकारणी व इतर सविस्तर माहिती जाहीर केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुसर्‍या टप्प्यात पास मिळेल. तर चिकोडी विभागात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच टप्प्यात बास पासचे वितरण केले जाणार आहे.

बस पास अर्ज वितरणासाठी शहर आणि तालुक्यात काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. कोणतेही शुल्क न आकारता अर्जांचे वितरण  होईल. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शाळा, महाविद्यालयांमध्ये बस पासचे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील. बसपास अर्जासोबात रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिक्षण शुल्क आदा केलेली पावती, स्टॅम्प आकाराचे तीन फोटो, शाळा-महाविद्यालयातील ओळखपत्र जोडावे लागणार आहे. 

अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सक्‍तीचा असेल. विद्यार्थ्यांनी बसपासची गरज असल्याबाबतचा अर्ज मुख्याध्यापक,     पान 7 

प्राचार्यांकडून मिळवून पास मिळविण्याचे आवाहन विभागीय नियंत्रकांनी केले आहे.  
बेळगावातील केंद्रे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तर चिकोडी विभागातील चिकोडी, सदलगा, निपाणी, बोरगाव, संकेश्‍वर, हुक्केरी, हत्तरगी, गोकाक, मुडलगी, यादवाड, अंकलगी, कुलगोड, रायबाग, अथणी, कागवाड, तेलसंग येथे पास काऊंटर सुरू असतील.

अपघात भरपाई दीडशे रुपये
बस पास वितरणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून अपघात नुकसान भरपाई म्हणून दीडशे रुपये आकारण्यात येणार आहेत. आयटीआय विद्यार्थ्यांकरिता ही रक्‍कम 160 रुपये असेल. अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांकरिता दहा महिन्याच्या पासचा दर दीडशे रुपये असेल. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी हा दर 160 रुपये असणार आहे.

“गुरूवारपासून पहिली ते दहावीपर्यंत पास वितरण सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पास मिळवावा.”
-एम. आर. मुंजी
विभागीय नियंत्रक.

शुल्क असे 

वर्ग          मुदत    शुल्क रु.    एकूण शुल्क    
1ली ते 7 वी        10 महिने    मोफत    150        
हायस्कूल विद्यार्थी       10 महिने    600    750        
हायस्कूल विद्यार्थिनी      10 महिने     400    550
कॉलेज        10 महिने    900    1050
सायं कॉलेज/पीएचडी    10 महिने    1200    1350
व्याव. अभ्यासक्रम    10 महिने    1400    1550
आयटीआय        12 महिने    1150    1310