Thu, Nov 15, 2018 20:05होमपेज › Belgaon › होन्नावरजवळ बस उलटून दोन ठार; १० जखमी

होन्नावरजवळ बस उलटून दोन ठार; १० जखमी

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 12:02AM

बुकमार्क करा

कारवार : वार्ताहर

केएसआरटीसीची बस उलटल्याने एक मुलगा आणि तरुणी ठार झाले असून अन्य 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी होन्नावर तालुक्यातील यलगुप्पा खेड्याजवळ घडली.

होन्नावर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अपघातातील मृतांची नावे प्रीतम (वय 9) रा. मंगळवार पेठ, हुबळी आणि एम. संगीता (वय 20) रा. म्हैसूर अशी आहेत. जखमींना उपचारार्थ होन्नावर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची स्थिती चिंताजनक असल्याचे समजते. रविवारी सकाळी कारवारहून चिक्कमंगळूरकडे केएसआरटीसी बस जात होती. बसमध्ये 35 प्रवासी होते.

होन्नावर -बंगळूर हायवेवरून बस जाताना अरुंद रस्त्यावर समोरून अचानक आलेल्या दुचाकीला जागा करून देण्याच्या प्रयत्नात बसचालकाने ब्रेक लावले असता बस रस्त्याबाहेर पडून उलटली.