Wed, Nov 14, 2018 23:56होमपेज › Belgaon › बेळगावमध्ये सात कार पेटवणार्‍या डॉक्‍टरला अटक

बेळगावमध्ये सात कार पेटवणार्‍या डॉक्‍टरला अटक

Published On: Jan 18 2018 12:26PM | Last Updated: Jan 18 2018 12:26PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील काही ठिकाणी कारना आग लावण्यात येत आहेत. मंगळवारी रात्री जाधवनगर भागात सात कार पेटवण्यात आल्या होत्या. ही घटना ताजी असताना बुधवारी तीन कार जाळण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एका डॉक्‍टराला अटक करण्यात आली असून डॉक्‍टर विकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेला डॉ. अमित गायकवाड हा मुळचा गुलबर्गा असून तो बेळगावमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्‍टर पदावर काम करीत आहे. 

गायकवाडला कार पेटविण्याची विकृती असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांने गुलबर्गा येथेही असाच प्रकार केला आहे. बुधवारी त्‍याला डीसी कंपाऊड येथे कार पेटवताना पकडण्यात आला. मध्यरात्री त्याच्या घराची तपासणी करण्यात आली असून एपीएमसीचे सीपीआय जे.एम.कालिमिर्ची यांनी ही कारवाई केली आहे.