Tue, Mar 26, 2019 07:41होमपेज › Belgaon › कर्नाटकमध्ये बसपच्या एकमेव मंत्र्याचा राजीनामा: कुमारस्वामींना धक्का

कर्नाटकमध्ये बसपच्या एकमेव मंत्र्याचा राजीनामा: कुमारस्वामींना धक्का

Published On: Oct 11 2018 8:54PM | Last Updated: Oct 11 2018 8:54PMबेंगळूरू : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर आणि काँग्रस यांच्या आघाडी सरकारमध्ये बहूजन समाज पक्षाकडून एकमेव कॅबिनेट मंत्री असलेल्या एन. महेश यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षणमंत्री असलेल्या एन. महेश यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री एन. कुमारस्वामी यांना पाठवला आहे.

बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी राजस्थान आणि मध्य प्रदेश  विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान एन. महेश यांनी आघाडी सरकारला पाठिंबा कायम राहिल असे स्पष्ट केले. 

राजीनाम्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, विधानसभेमध्येच माझ्याविरुद्ध कारस्थाने रचली जात होती, जेणेकरून मी बेंगळूरूमध्ये अडकून राहीन, त्यामुळे मला माझ्या कोल्लेगल विधानसभा मतदारसंघात लक्ष देता येत नव्हते, त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मजबूत करणे आवश्यक आहे. मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, तरी  पाठिंबा कायम राहणार आहे. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत आहे.

कोल्लेगल विधानसभा मतदारसंघात तब्बल २५ वर्षांनंतर एन. महेश निवडून आले आहेत. २२२ विधानसभा सदस्य असलेल्या कर्नाटकमध्ये बहुमतासाठी ११३ सदस्यबळ असणे आवश्यक आहे. सध्या कुमारस्वामी यांच्या बहुमताचा आकडा ११६ वर आला आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे १०४ आमदार आहेत.