Thu, Apr 25, 2019 18:18होमपेज › Belgaon › मुगळखोड येथे पैशासाठी भावाचा खून

मुगळखोड येथे पैशासाठी भावाचा खून

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:06PMरायबाग : प्रतिनिधी 

पैशासाठी लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील मुगळखोड येथे 28 फेबु्रवारी रोजी रात्री घडली. विठ्ठल हणमंत गोकावी (26) असे मृताचे नाव आहे. 

मुगळखोड येथील दासरलोट येथे गोकावी कुटुंब राहते. या घरातील विठ्ठल गोकावी व शिवानंद गोकावी दोघे शेतात मजुरी करतात. मजुरीतून आलेले पैसे बचत करून त्यांनी सुमारे 40 हजार रुपयांची ठेव ठेवली होती. शिवानंद या लहान भावाला दारूचे व्यसन होते. व्यसनात त्याने सर्व पैसे उधळल्याचे विठ्ठल या मोठ्या भावाला समजले. यामुळे आठवड्यापासून त्यांच्यात बाचाबाची चालू होती. या भांडणाला कंटाळून शिवानंदने बुधवारी रात्री मोठा भाऊ झोपेत असल्याचे पाहून धारदार हत्याराने मानेवर हातावर सपासप वार केले. विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला. शिवानंद हारूगेरी पोलिस स्थानकात गुरुवारी पहाटे हजर झाला. 

रायबागचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे व हारुगेरीचे उपनिरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हारूगेरी स्थानकात घटनेची नोंद झाली असून  तपास सुरू आहे.