Thu, Apr 25, 2019 21:44होमपेज › Belgaon › आधी सीमाप्रश्‍न, नंतर म्हादई चर्चा

आधी सीमाप्रश्‍न, नंतर म्हादई चर्चा

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 8:56PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक सरकारकडून म्हादईचे पाणी वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याला गोवा मुख्यमंत्र्यांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. परंतु, हा भाग संपूर्ण मराठी असून महाजन अहवालानुसार महाराष्ट्रात जातो. त्यामुळे न्यायालयात सीमाप्र्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत म्हादईवर चर्चा करू नये, अशी मागणी मराठी युवा मंचतर्फे करण्यात आली आहे. उपरोक्त मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी पाठविली आहे. यामध्ये त्यांनी म्हादईप्रश्‍नी महाराष्ट्राने कोणतीही चर्चा करू नये अशी मागणी केली आहे.

म्हादई हा जलतंटा केवळ गोवा व कर्नाटकाचा नाही. यामध्ये महाराष्ट्रासह सीमाभागाचा समावेश आहे. कर्नाटक सरकारने ज्या कळसा भांडूरा नाल्यातील पाणी वळविण्याचा घाट घातला आहे. परंतु हा भाग महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या 865 खेड्यांच्या परिसरात येतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत सुनावणी सुरू आहे. हा भाग संपूर्णपणे मराठी भाषिक असून त्यांच्यावर हा अन्याय आहे.

यामुळे महाराष्ट्र सरकारने म्हादईबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. कर्नाटकाला पहिल्यांदा सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष त्यानंतर म्हादईबाबत चर्चा अशी भूमिका घ्यावी. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी माणसांना अडचणीत आणणार्‍या इतर समस्यांवरदेखील चर्चा करावी. त्यानंतर याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर सूरज कणबरकर व नारायण किटवाडकर यांच्या सह्या आहेत.