Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Belgaon › भाजप-काँगे्रसमध्ये ‘ट्विटर वॉर’

भाजप-काँगे्रसमध्ये ‘ट्विटर वॉर’

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:56AMबंगळूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना कर्नाटकातील काँग्रेसच्या पाच वर्षांतील कामगिरीवर पंधरा मिनिटे सलग कागद हाती न घेता बोलण्याचे आव्हान दिले आहे. त्यावरून दोन्ही पक्षांत ट्विटर वॉर सुरू झाले आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी याविषयी ट्विट केले आहे. ‘येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदी असताना भाजप सरकारने केलेल्या कामांविषयी पंधरा मिनिटे बोलून दाखवा, ते सुद्धा हातात कागद घेऊन’, असे त्यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे.  शिवाय देवेगौडांबाबत निवडणुकीवेळीच प्रेम उतू जात असल्याविषयी संशय व्यक्त केला आहे.

2014 मध्ये देवेगौडांविषयी केलेल्या टीकेची आठवण सिद्धरामय्यांनी करून दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी यांना मोदींकडून कितपत आदर दिला जातो, हे सर्वांनीच पाहिले आहे. देवेगौडांनाही राजकीय निवृत्ती घेण्यास भाग पाडणार असल्याचे विधान मोदींनी केले होते, याची आठवणही सिद्धरामय्यांनी करून दिली आहे.

फसल विमा योजनेबाबत अनेक ठिकाणी पंतप्रधात बोलत असले तरी त्यामध्ये राज्य सरकारचा वाटा 50 क्के असून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करणारे कर्नाटक हे पहिले राज्य असल्याचे सिद्धरामय्यांनी म्हटले आहे. त्यावर प्रदेश भाजपने कर्नाटकातील अत्याचारांत वाढ झाल्याचे ट्विट केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या काळात बलात्कार प्रकरणांत 188 टक्के वाढ, 53 टक्के

लैंगिक छळ, दलितांवरील अत्याचार 

43 टक्के वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. झोपडपट्टी विकास महामंडळाचा 2500 कोटींचा घोटाळा, त्यासाठी कंत्राट देताना दहा टक्क्यांचे कमिशन, काँग्रेस आमदार प्रमोद मध्वराज यांचा 193 कोटींचा बँक घोटाळा, दिलेली आश्‍वासने पूर्ण केली काहीन. यावरून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा दिसून येत असल्याची टीका भाजपने केली आहे.
त्यावर काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर देताना काही प्रश्‍न मोदींना विचारले आहेत. खाणसम्राट रेड्डींना पाठिंबा देण्यामागे कारण काय? म्हादई पाणीप्रश्‍न सोडविण्यास असहकार्य का? शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून मदत का मिळत नाही? पेट्रोलचे दर वाढण्यामागील कारण काय?