Sat, May 30, 2020 14:52होमपेज › Belgaon › बेळगाव : एपीएमसी मार्केटमध्ये भाजी व्यवहार ठप्प

बेळगाव : एपीएमसी मार्केटमध्ये भाजी व्यवहार ठप्प

Last Updated: Mar 30 2020 10:07AM
बेळगाव: प्रतिनिधी 

कर्नाटकात दुसऱ्या क्रमांकावर असलेले बेळगाव येथील एपीएमसी भाजी मार्केट १३२ गाळ्यांमध्ये विस्तारले आहे. परराज्यातून या ठिकाणी भाजीची निर्यात मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, आता प्रशासनाने काही ठराविकांनाच परराज्यात संधी दिल्याने भाजीची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये मंदीचे सावट पसरले आहे. दररोज चार कोटीची उलाढाल या भाजी मार्केटमध्ये होते. मात्र, आता लॉकडाऊन काळात एक कोटींचीदेखील भाजीची उलाढाल होण्यास तारेवरची कसरत आहे. परराज्यातील येणारे चालक-मालक यांचीदेखील गोची होत आहे. 

वाचा - नागपुरात आणखी २ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह; १३ वर्षाच्या मुलाला लागण

प्रत्येक गाळ्यामध्ये किमान ४० हजारांची उलाढाल दररोज होते. मात्र, आता ती उलाढाल दहा ते पंधरा हजारांवर आली आहे. स्थानिक भाजी विक्रेत्यांनी एपीएमसीकडे पाठ फिरवल्यामुळे भाजीचा उठाव होत नाही. शहरात ५८ वॉर्डात २५ भाजीगाड्या भाजी विक्री करत आहेत. मात्र, अजून गैरसोय दूर झालेली नाही. भाजी खरेदी केलेले घाऊक व्यापारीदेखील आर्थिक संकटात सापडले आहेत.

फळभाज्या पालेभाज्याचा उठाव न झाल्याने जागेवरच पडून कुजत आहेत. ठिकठिकाणी भाजी मार्केटमध्ये टोमॅटोचे ढिग पडलेले आहेत. शेतकरी भाजीचा विकण्यासाठी भाजी घेऊन बाजारात फेरफटका मारत आहे. मात्र, त्याच्याकडून खरेदीदार भाजी खरेदी करत नाहीत. त्यामुळे भाजीपाला परत होऊन जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वाचा - सोलापूर : मोहोळमध्ये कोरोनाचे ३ संशयित रुग्ण आढळले?