होमपेज › Belgaon › सीमालढ्यात युवकांनी सक्रिय व्हावे : दीपक दळवी

सीमालढ्यात युवकांनी सक्रिय व्हावे : दीपक दळवी

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 10:48PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी मागील 12 वर्षापासून येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने सुरू असलेली साहित्य चळवळ कौतुकास्पद आहे. मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्धीने लढा देत आहे. आम्हाला कोणतीही सत्ता, अधिकार मिळवायचे नाहीत. केवळ मराठी मायबोलीच्या राज्यात जाण्याची आस आम्हांला लागून राहिली असल्याचे मत मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले.

येळ्ळूर येथे 11 रोजी होणार्‍या साहित्य संमेलन मुहूर्तमेढ उभारणी प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी होते.परमेश्‍वरनगर येथील प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात रविवारी मुहूर्तमेढ ता. पं. सदस्य रावजी  पाटील व विजयमाला पाटील या दाम्पत्याच्या हस्ते उभारण्यात आली. महात्मा फुले प्रतिमेचे पूजन सरिता पाटील यांनी केले. 

दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातली मराठी संस्कृती टिकली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भाषेचे रक्षणदेखील केले पाहिजे. मराठी भाषेचा हा लढा युवकासमोर गेला पाहिजे. त्यातूनच जागृतीचे कार्य घडेल.

यावेळी नवहिंदचे संस्थापक वाय. बी. चौगुले, वाय. एन. मजुकर, संमेलनाचे नियोजित स्वागताध्यक्ष एल. आय. पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी यांनी विचार मांडले. माजी ता. पं. अध्यक्ष मारुती कुगजी, उपस्थित होते. 

यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा अनुसया परीट, तानाजी हलगेकर, अजित पाटील, राजू पावले, शिवाजी पाटील, अर्चना पठाणी, राजकुंवर पावले, राजू उघाडे, मुकुंद घाडी, दुद्दाप्पा बागेवाडी, डॉ. जी. आय. पाटील, गोविंद काळसेकर, वाय. सी. गोरल, रमेश मेणसे, बबन कानशिडे, संजय मजुकर, राजू मरवे, डॉ. तानाजी पावले, विद्या पाटील, रामभाऊ कुट्रे, बी. बी. पाटील, एस. पी. मेलगे  आदी उपस्थित होते.प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले.