Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Belgaon › निष्ठावंत कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न

निष्ठावंत कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 10:31PMबेळगाव : प्रतिनिधी 

 मी कट्टर मराठी अभिमानी आहे. मला मराठी माणसांबद्दल सार्थ अभिमान आहे. मी ही समितीचाच कट्टर कार्यकर्ता होतो. मात्र, समितीतील काही लोकांच्या वृत्तीमुळेच मी समिती सोडून भाजपमध्ये आलो, अशा लोकांपासून सावधान राहण्यासाठी व मराठी माणसाला जागृत करण्यासाठी मी एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओनंतर दोन नगरसेवकांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांच्याच भाषेत मी समजावून सांगितले, अशी माहिती सुनिल चौधरी यांनी दिली. 

सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे पसरले आहे. यंदाची निवडणुक समितीला पोषक आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये समितीचे प्रत्येकी दोन उमेदवार उभे आहेत. यामुळे कोणाला मतदान करायचे या गोचीत मराठी माणूस सापडला आहे. मराठी माणसाला जागे करण्यासाठी मी व्हिडीओ तयार केला व शत्रूंपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. 

मी तयार केलेला व्हिडिओ त्यांना बोचला. यानंतर दोन नगरसेवकांनीमला रात्री फोनकरून धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसर्‍या दिवशी सकाळी मॉर्निग वॉकला माझा पाठलाग करूनही मला धमकाविण्याचा प्रयत्न केला. 
सुनील, तू त्यांच्याबद्दल असं बोलायला नको होतास...असे ते मला बोलले. पण मी माझ्या वक्तव्यावर ठाम राहिलो. मॉर्निंग वॉकला आलेले इतर कट्टर मराठी कार्यकर्तेही माझ्या समर्थनात आले. त्यामुळे नगरसेवकांनी पळ काढला. 
सीमाभागातील फक्त मराठा समाजच नव्हे इतर समाजाचे लोक देखील महाराष्ट्रात जाण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी दोन्ही गटांनी एकत्रीत येऊन एकी केली पाहिजे. विचाराने एकत्रित येऊन मराठी संस्कृती पुढे नेली पाहिजे, असेही चौधरी यांनी दै. पुढारीला सांगितले.