होमपेज › Belgaon › आज अखेरचा श्रावण सोमवार

आज अखेरचा श्रावण सोमवार

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 02 2018 10:41PMबेळगाव : प्रतिनिधी

श्रावण मासातील अखेरचा आज सोमवार 3 रोजी आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेल्या श्रावण मासामध्ये 13, 20, 27  ऑगस्ट व 3 सप्टेंबर असे 4 सोमवार आले होते.श्रावणातील अखेरच्या सोमवारनिमित्त  शिवमंदिरातून विशेष पूजा, सहस्र बिल्वार्चन, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

श्रावण मासातील सोमवारी शिवभक्त दिवसभर उपवास करून भगवान शंकराची आराधना  करीत असतात. सोमवारी शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍या सोमवारी तीळ, तिसर्‍या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस व पाचवा  सोमवार आल्यास सातूची शिवामूठ वाहण्यात येते.श्रावणातील अखेरच्या सोमवारनिमित्त शिवमंदिरांची यात्रा, रथोत्सव असे कार्यक्रमही होणार आहेत.