Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Belgaon › तालुका  म.  ए. समितीची उद्या  बैठक

तालुका  म.  ए. समितीची उद्या  बैठक

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 18 2018 10:15PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात तालुका म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. याबाबत कारणीमिमांसा व  म. ए. समिती अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवार दि. 2 रोजी दु. 2 वा. तुकाराम महाराज ट्रस्ट (ओरिएंटल स्कूल) येथे बैठक आयोजित केली आहे.

बैठकीत विधासभा निवडणुकीतील अपयशाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सीमाभागात संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. यावेळी म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधीं, युवा व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ता. म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले आहे.

दरम्यान, निवडणुकीनंतर पहिल्यांदा बैठक होत आहे. यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली असून बैठकीत कोणता निर्णय घेण्यात येणार याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. रविवारी होणार्‍या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.