Thu, Apr 25, 2019 03:45होमपेज › Belgaon › सातवी पास ते डॉक्टर!

सातवी पास ते डॉक्टर!

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 12:49AMबेळगाव : प्रतिनिधी

आमदार बनण्यासाठी साक्षर असण्याची गरज नाही. फक्त त्या राज्याचा नागरिक असणे गरजेचे आहे. साक्षर असण्याचीच गरज नसल्यामुळे दहावी, बारावी अशी किमान पात्रता असावी ही अपेक्षा तर त्याहून पुढची. त्यामुळे जिल्ह्यात सातवी पास उमेदवारही आमदार बनला आहे, आणि डॉक्टरही आमदार बनल्या आहेत!

रामदुर्गचे आमदार महादेवप्पा यादवाड हे अल्पशिक्षित म्हणजे केवळ सातवी पास आहेत. तर खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर या व्यवसायाने डॉक्टर आणि एमबीबीएस पदवीधर आहेत.  बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर उच्चशिक्षित म्हणजे एम. ए. आहेत. तर अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी इंजिनिअर आहेत.तीन आमदार वकील आहेत. त्यामध्ये अनिल बेनके,  कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर आणि बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील, कुडचीचे आ. पी. राजीव आणि चिकोडीचे आ. गणेश हुक्केरी पदवीधर आहेत. इतर सार्‍या आमदारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. पीयूसी हे जिल्ह्यातील 18 आमदारांचे सरासरी शिक्षण आहे.