Sun, Aug 25, 2019 19:58होमपेज › Belgaon › पुणे-बंगळूरू राष्‍ट्रीय महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी

पुणे-बंगळूरू राष्‍ट्रीय महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी

Published On: Jun 29 2018 7:29PM | Last Updated: Jun 29 2018 7:29PMबेळगाव : प्रतिनिधी 

पुणे - बंगळूरू राष्‍ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात रसायनाचा टँकर पलटी झाला. या अपघातामुळे महामार्गाच्या दुतर्फा पाच किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा लागल्‍या आहेत. 

बंगळूरहून मुंबईकडे जाणारा रसायणाचा टँकर चालकाचा ताबा सुटल्‍याने महामार्गाच्या वळनावर पलटी झाला. या अपघातात टँकरचा चालक जखमी झाल्‍याने त्‍याला उपचारांसाठी निपाणीच्या सरकारी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्‍निशमन दलाने घटनास्‍थळी धाव घेतली. टँकरमधील घातक रसायन रस्‍त्‍यावर आल्‍याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्‍हणुन अपघातापासून ५०० मिटर अंतरावर वाहने थांबवली आहेत.