Mon, May 27, 2019 01:13होमपेज › Belgaon › बेळगावच्या माणसांतच गोडवा : स्वप्निल जोशी

बेळगावच्या माणसांतच गोडवा : स्वप्निल जोशी

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 10:53PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावची माणसे खूप साधी, भोळी आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा गोडवा असून येथे वारंवार यायला आवडेल, असे कौतुकोद्गार मराठी चित्रपट अभिनेता स्वप्निल जोशी यांनी काढले.

एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त अभिनेता जोशी गुरुवारी बेळगावच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जोशी म्हणाले, बेळगावचे वातावरणदेखील अतिशय उत्तम असून विलोभनीय आहे. खरे तर बेळगाव हे बेल्जियम असून याच्या प्रेमात पडावे असे वातावरण आहे. येथील गारवा गोड आहे. संधी मिळेल तेव्हा बेळगावला यायला आपल्याला आवडेल.

येत्या काळात मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आपण एका खेळाडूची भूमिका केली आहे. आपली चित्रपटसृष्टीत रोमँटिक नायकाची इमेज आहे. परंतु, काही भूमिका आव्हान म्हणून स्वीकाराव्या लागतात. खर्‍या कलाकाराला ते आव्हान असते, असे त्यांनी सांगितले.