Tue, Jan 22, 2019 10:23होमपेज › Belgaon › दुधाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार 

दुधाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार 

Published On: Feb 02 2018 5:55PM | Last Updated: Feb 02 2018 5:55PMबेळगाव : प्रतिनिधी

अंकली मांजरी रस्‍त्‍यावर दुधाच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात  दुचाकीस्‍वाराचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना अंकली गावच्या हद्दीत घडली.

टँकरची धडक इतकी जोरात होती की, दुचाकीस्‍वाराचा जागीच मृत्‍यू झाला. भीमसेन उमराणे (वय 39 रा अंकली) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात झाली आहे.