Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Belgaon › बेळगावातून ५० दाम्पत्ये आखाड्यात 

बेळगावातून ५० दाम्पत्ये आखाड्यात 

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 10:21PMबेळगाव : प्रतिनिधी

 12 रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी चिकोडी तालुक्यातून   जोल्ले दांपत्य दोन भिन्न मतदारसंघातून भाजपतर्फे प्रतिस्पर्धी उमेदवारांशी लढत देत आहेत. बेळगाव  जिल्ह्यातील अन्य  17 मतदारसंघात याहून अधिक काही वेगळे चित्र असू शकेल. मात्र 1985 च्या निवडणुकीत 50 दांपत्यांनी बेळगाव शहर मतदारसंघातून (सध्याचे बेळगाव उत्तर) नशीब अजमाविण्याचा प्रयत्न केला होता.

यामध्ये 10 दांपत्ये पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित होती. लोकदर्शनचे संपादक एम. बी. देसाई दांपत्य, कन्नडम्माचे एम. एस. टोपण्णावर दांपत्य, नाडोजचे राघवेंद्र जोशी, अशोक चंदरगी, सुधा पट्टेद यासारख्या नावांचा उल्लेख करता येईल.  एकूण 301 मतदार रिंगणात होते.निवडणूक आयोगाला  हे एक आव्हानच ठरले होते. मतपत्रिका (बॅलेट पेपर) मुद्रण, मतदान केंद्रे निश्‍चित करणे, मतदारांत जागृती अशी कामे आव्हानात्मक ठरली होती तर त्याहीपेक्षा अधिक कठीण म्हणजे कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह द्यायचे, यात निवडणूक आयोगाचा घोळ उडाला होता. 

कावळा, चिमणी, कांगारू, ताट, पेला, तांब्या, बुट्ठी, हिरा, साखळी, बस, ट्रॅक्टर अशी चिन्हे वाटप करण्यात  आली होती. 33 बाय 23 फुटाची भली मोठी मतपत्रिका तयार करण्यात आली. शिवाय दोन्ही बाजुने मुद्रण करण्यात आले होते. या मतपत्रिकेची मतदारांना माहिती देण्यासाठी  निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना गल्लोगल्ली भेट देऊन करताना हैराण होण्याची वेळ आली होती. एवढे होऊनही मतदान मात्र  एकूण मतदारांच्या निम्म्याहून थोडे जादा इतके कमी मतदान झाले होते. मतदार 1,11,931 होते तर 66,390 जणांनी मतदान  (59 टक्के) केले होते.686 मते बाद ठरली होती.