Sun, Oct 20, 2019 01:56होमपेज › Belgaon › संगीताच्या पंढरीत बालनाट्यांना हवे पाठबळ

संगीताच्या पंढरीत बालनाट्यांना हवे पाठबळ

Published On: Mar 06 2018 11:16PM | Last Updated: Mar 06 2018 9:30PMबेळगाव : श्रीकांत काकतीकर

बेळगावला दीडशे वर्षांची संगीत परंपरा आहे. नामवंत कलाकारांचे वास्तव्य होते. बेळगावला संगीताची पंढरी संबोधण्यात येत असे. संगीत रंगभूमी समृद्ध बनविण्यासाठी विविध प्रकारच्या नाट्यचळवळी  आयोजित केल्या जात होत्या. अनेक नाट्यसंस्थांचा यात मोलाचा वाटा आहे. बालनाट्याला पाठबळ मिळणे आवश्यक आहे.

कै. पं. कागलकरबुवा, कै. पं. रामकृष्णबुवा वझे, नाट्य कलाकार जयमाला शिलेदार यांचे वडील नारायणराव जाधव यांच्यापासून पं. जितेंद्र अभिषेकी ते पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत अनेकांनी बेळगावात वास्तव्य करून संगीत आणि नाट्यकलेची सेवा केली. संगीत शाकुंतलचा पहिला प्रयोग  शहापुरात 1882 साली झाला. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतलाबरोबरच रामराज्य वियोग, संगीत सौभद्रचे येथे प्रयोग केले. त्याकाळी अण्णासाहेबांच्या संगीत नाटकांमुळे अनेक दिग्गज कलाकार बेळगावकडे आकर्षिले गेले. स्कूल ऑफ कल्चर, खडेबाजारमधील शिवानंद थिएटरमध्ये बालगंधर्वांच्या नाटकांपासून ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकांचे प्रयोग होत असत. 

स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगावातील काही नाट्यवेड्या आणि संगीत संस्थांच्यावतीने गीत—संगीतांचे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जात असत. त्याकाळी वैद्य नांदणीकर यांच्या निवासस्थानी आयोजित केल्या जाणार्‍या नवरात्रोत्सव संगीत कार्यक्रमाला कोल्हापूर, धारवाड, हुबळी, संकेश्‍वर, निपाणी येथील दिग्गज कलाकार व रसिकांची आवर्जुन उपस्थिती असे. कागलकरबुवा, रामकृष्णबुवा वझे, पं. शिवरामबुवा, पं. गोविंदराव गायकवाड, पं. उमामहेश्‍वरबुवा, शिरोडकरबुवा आदींच्या तालमीतून नाटकातील सूर सातत्याने आळविले जात असत. शास्त्रीय, सुगम संगीताबरोबरच बेळगावातील मैफलीत नाट्य संगीताला विशेष स्थान देण्यात येत असे. 

शारदोत्सव महिला समितीने 1971 पासून हाती घेतलेले कार्य उल्‍लेखनीय आहे. महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या या संस्थेची ख्याती महाराष्ट्रात चर्चेत आहे. संस्थेने बेळगाव परिसरातील हजारो महिलांना हक्‍काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले. दरवर्षी पाच दिवसांचा ‘शारदोत्सव’ व एक दिवसाचा ‘चैत्रोत्सव’ होत असतो. 

1973 ते 2014 पर्यंत संस्थेने तब्बल चौदा नाटकांचे सादरीकरण केले. महाराष्ट्र सरकारनेही शारदोत्सव सोसायटीच्या कार्याची दखल घेत संस्थेला चार लाखाचे अनुदान दिले. संस्थेच्यावतीने रंगमंचीय स्पर्धा, एकांकिका, पथनाट्य, नाट्यछटा, पौराणिक व ऐतिहासिक नाटके सादर केली जातात. यातून बेळगावच्या नाट्यचळवळीला पुढे नेण्याचे काम शारदोत्सव महिला सोसायटी करत आहे.

नाट्यांकुर थिएटर्स संस्थेचे बेळगावातील नाट्यसृष्टीत वेगळे स्थान आहे. प्रा. संध्या देशपांडे यांनी 1985 साली याची स्थापना केली. केवळ मराठीच नव्हे तर कानडी रंगभूमीवरही नाट्यांकुरने ठसा उमटविला. 1990 साली बेळगावात बालनाट्य चळवळ हाती घेण्यात आली.शबय...