Mon, Apr 22, 2019 05:49होमपेज › Belgaon › ‘अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घाला’

‘अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घाला’

Published On: Aug 19 2018 1:27AM | Last Updated: Aug 18 2018 11:13PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात अंमली पदार्थांच्या  विक्रीवरुन बेळगावचे नाव चर्चेत आले होते. गेल्या  अधिवेशनमध्ये यावरुन वादळी चर्चा झाली होती. त्यानुसार पोलिस खात्याला वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस खात्याकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. 

नुकताच उद्यमबाग पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत केलेल्या कारवाईमुळे अमली पदार्थांची विक्री रोखण्यात पोलिस खात्याला अपयश आल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्यात येत असल्यचे समोर आले आहे. उद्यमबाग पोलिसांनी एका प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली आहे.  यापूर्वीही आरपीडी क्रॉसवर काहीजणांना रंगेहात पकडण्यात आले होते.  गँगवाडी परिसरातही गांजा विक्री करणार्‍यांना पकडण्यात आले होते. यावरुन सदर प्रकार महाविद्यालयांच्या परिसरात घडत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयानी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

उद्यमबाग पोलिसांनी केलेल्या कावाईत दोघांना अटक केली आहे. बागेवाडी पोलिसांनी हलगा येथे  गांजा विक्री कणार्‍या चौघांना अटक केली आहे.  अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून 1 किलो 254 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. चेतन कुरंगी (वय 20) अनिल चौगुले (वय 21 ) रुद्राप्पा बाळगन्नावर (वय 35 ) पुंडलिक काळे (वय 65) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. 
बागेवाडी पोलिसांनी शेतवडीत घेण्यात आलेल्या गांजाचे पीकही काही दिवसांपूर्वी जप्त केले आहे. त्यामुळे शहर परिसरात अमली पदार्थांची विक्री रोखण्यात पोलिस खात्याला कितपत यश येणार, हे पाहावे लागणार आहे. पोलिस आयुक्तांसह अधिकार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून  गैरप्रकार रोखण्यासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याने पोलिस अधिकार्‍यांना अधिक सतर्क राहावे लागत आहे.