Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Belgaon › मतदारांसाठी आलिशान गाड्या?

मतदारांसाठी आलिशान गाड्या?

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 10:33PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून गल्लीतील गावपुढारी आपल्याच उमेदवाराची पताका फडकावी म्हणून कंबर कसत आहेत. 500 ते 1000, 1500 मतांसाठी पराभव होऊ नये म्हणून प्रयत्न होत आहेत. 

नोकरी कामधंद्यासाठी देशाची राजधानी मुंबई, विद्येचे माहेरघर पुणे आणि आयटी हब्ब बंगळूर येथे जिल्ह्यातील हजारो मतदार आहेत. यातील काही मतदार शिक्षणासाठी काही नोकरीनिमित्त बाहेर आहेत. ीजल्ह्यातील उमेदवाराकडून त्यांच्यासाठी पायघड्या घालण्यास सुरूवात केल्या आहेत. मतदानादिवशी येण्यासाठी अलिशान गाड्यांची तजवीज केली जात आहे. 

जिल्ह्यातील 18 मतदारसंघात 203 उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कुडची मतदार संघात 19 उमेदवार आहेत. तर सर्वात कमी यमकनमर्डी मतदारसंघात 5 उमेदवार आहेत. दहा पेक्षा अधिक उमेदवार असलेले जिल्ह्यातील 13 मतदारसंघ आहेत. 

बेळगाव उत्तरमध्ये 15, बेळगाव दक्षिणमध्ये 13, बेळगाव ग्रामीण व खानापूरमध्ये 12, निपाणी व चिकोड्डी- सदलगामध्ये प्रत्येकी दहा उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात प्रचार जोर सुरू केला आहे. 

प्रत्येक मत हे आपल्या पारड्यात कसे मिळवता येईल याची व्युह रचना करण्यात येच आहे. दुसर्‍या फळीतील नेत्यावर एकेका मताला किती किंमत मोजावी याचे नियोजन देण्यात आल्याची चर्चा आहे. यात राष्ट्रीय पक्ष आघाडीवर 
आहेत. 

जिल्ह्यात बहुतेक मतदारसंघात काँग्रेस, भाजप, निजद अशी तिरंगी लढत होणार आहे. बेळगाव उत्तर, दक्षिण, बेळगाव आणि खानापूर या मतदारसंघात म. ए. समितीच्या उमेदवारामुळे चौरंगी लढती होतील. शनिवार दि.28 पासून खेडोपाडी प्रचार सुरू आहे. प्रत्येक गावातील तरुण, नोकरदार, विद्यर्थी, व्यवसायिक कोठे कोठे आहेत याचा शोध घेतला जात आहे.