Tue, Apr 23, 2019 09:56होमपेज › Belgaon › देव पावला; उमेदवारांना अन् मतदारांनाही

देव पावला; उमेदवारांना अन् मतदारांनाही

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 9:30PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुक आयोगाने निवडणुकीसंदर्भात कडक नियम लागू केले आहेत. आचार संहिता काळामध्ये कोणत्याच अनुचित घठनेला वाव मिळू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली. निवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या उमेदवारांच्या खर्चावर ही लगाम घातला आहे. तरी देखील अनेक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणार्‍या पार्ट्या कांही कमी नाहीत. निवडणूक आयोगाची नजर चुकविण्यासाठी नामी शक्कल लढविण्यात येत आहेत. देवादिकांच्या नावावर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 

कायदा व अटी या तोडण्यासाठीच केल्या जातात. अशी प्रवृती नागरीकांमध्ये वाढीस लागू लागली आहे. केेंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जाणारा मद्याचा वापर व पैशाची उधळण यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

हे प्रकार थांबणे आवश्यक आहे. यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार्‍या उमेदवारांच्या स्वैर खर्चावर निर्बंध घालून खर्चाची मर्यादा घतली आहे. होणार्‍या ओल्या पार्ट्यांवर ही कडक नजर ठेवली आहे. मद्याची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चेकपोस्ट उभारले आहेत. असे असलेतरी निवडणूक आयोगाची नजर चुकवून ग्रामीण भागात पार्ट्या रंगत आहेत.


मतदानासाठी मोजकेच दिवस असल्याने आतापासूनच मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कसरत चालविली आहे. यासाठी नामी शक्कल लढविण्यात येत आहे. राजकीय पक्षांकडून देण्यात येणार्‍या पैशावरून पार्ट्या रंगत आहेत. यासाठी देवा दिकांची मदत घेण्यात येत आहेत. देवादिकांच्या नावावर बोकड कापून पार्ट्या दिल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी 
एकामेकांवर चढाओड करुन पार्ट्या देण्याचा सपाटा सुरु केला आहे. 

निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची नजर चुकविण्यासाठी गावाबाहेर असणार्‍या देव देवतांच्या नावाचा आधार घेऊन पार्ट्या दिल्या जात आहेत. युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मटन, मद्य दिले जात आहे. याला आकर्षित होऊन अनेक तरुण या पार्ट्यांकडे वळत आहेत.   यात मतदार मात्र  राजकीय पक्षाकडून मिळेल त्या पार्टीवर ताव मारुन जय बोलण्यात मात्र धन्य मान असल्याचे चित्र दिसून येत आहे.