Fri, Mar 22, 2019 06:17
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बेळगावजवळही रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण

बेळगावजवळही रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 19 2018 12:16AMबेळगाव : प्रतिनिधी

मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून बेळगाव शहरातून जाणार्‍या रेल्वमार्गाचे दुपदरीकरणाचे काम गुरुवारपासून सुरु करण्यात आले आहे. समर्थनगरच्या पूर्वेकडील बाजूने मातीचा भराव टाकून, सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

अनेक वर्षापासून मिरज-लोंढा रेल्वे दुपदरीकरणाचे लोंबकळत असलेले रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आले. दुपरीकरणाबाबतच्या हरकती ध्यानात घेऊन तेवढा भाग सोडून उर्वरित मार्गाचे रुंदीकरण प्रगतीपथावर आहे. 

शिवराय उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे खात्याने  हे काम हाती घेतले आहे. भरतेश स्कूलच्या बाजूने पावसाळ्यात किल्ल्याच्या खंदकातील अतिरिक्त पाण्याच्या होणार्‍या विसर्गाला वाट करून देणारा व रेल्वे रस्त्याला छेदणार्‍या मोरीवजा छोट्या  पुलाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे.  या पुलापासून ते जुन्या धारवाड रोडवरील उड्डाण पुलाअखेरपर्यंत दुपरीकरण करण्यास सुरवात करण्यात आली आहे. लाल मातीने भरलेले डंपर, जेसीबी तसेच रोड-रोलर यांचा राबता आहे. 

लांब पल्ल्याच्या तसेच पॅसेंजर गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने दुपदरीकरणाची गरज आहे. जुना धारवाड रोड ते पुढे स्टेशन  दरम्यान रेल्वे रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या दाट लोकवस्तीशेजारून जाणार्‍या रेल्वे रस्त्याचे दुपरीकरण करणार का? हे प्रश्‍न आता उभे ठाकले आहेत. दुपरीकरणास सुरवात हे येथील रहिवाशांच्या रोषाला आमंत्रण देणारे असल्याने अन्य उपाय शोधणे क्रमप्राप्त आहे.