Tue, Oct 22, 2019 01:50होमपेज › Belgaon › पाचजणांना सशर्त जामीन

पाचजणांना सशर्त जामीन

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:48PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली, भडकल गल्ली व जालगार गल्लीतील दंगलप्रकरणी मार्केट पोलिसांनी पाचजणांवर भादंवि 143, 147, 148, 153 (ए), 332, 333, 307, 435, 427, 353, सहकलम 149 व केपीडीपी कायदा 2 (ए)(बी) कलमाखाली अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहामध्ये  केली होती. त्या आरोपींची बेळगाव जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांनी सशर्त जामीन मंजूर करून त्यांची सुटका करण्याचा आदेश बजाविला आहे. 
प्रत्येकी 50 हजार रु.ची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचे दोन जामीन,  आरोपींनी रोज पोलिस स्थानकाला हजेरी द्यावी व साक्षीदारांना फोडण्याचा प्रयत्न करू नये या अटीवर त्यांना जामीन मंजूर केला आहे.

त्यामध्ये कुणाल जयराम हंगीरगेकर (वय 25, रा. पांगुळ गल्ली), योगेश गोपाळ हट्टीकर (वय 18, रा. भातकांडे गल्ली), अजय वामन गायकवाड (वय 20, रा. खडकगल्ली), रवि काशी  जालगार (वय 24, रा. कपिलेश्‍वर मंदिर मागे) व शुभम परशराम नेसरकर (वय 21, रा. भाग्यनगर, अनगोळ) यांचा समावेश आहे. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार व अ‍ॅड. हेमराज बेंचण्णावर यांनी काम पाहिले.  त्याचप्रमाणे दंगलीतील मनोज महेश राऊत (वय 26, रा. बापटगल्ली), संपत यशवंत शिंदे (वय 23, रा. कंग्राळ गल्ली) व अभिजित गंगाधर  पाटील (वय 18, रा. गाडेमार्ग शहापूर) यांनाही मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.  त्यांचाही जामीन अर्ज न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांनी मंजूर करून त्यांची जामिनावर सुटका करण्याचा आदेश बजाविला आहे. आरोपींच्यावतीने महेश बिर्जे व रघुवीर कलवार काम पाहत आहेत.