Thu, Jun 27, 2019 02:06होमपेज › Belgaon › बेळगाव ‘शैक्षणिक’ मध्ये ३१०६१ परीक्षार्थी 

बेळगाव ‘शैक्षणिक’ मध्ये ३१०६१ परीक्षार्थी 

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:29AM

बुकमार्क करा

बेळगाव  : महेश पाटील  

येत्या मार्च-एप्रिल महिन्यामध्ये होणार्‍या 10 वी परीक्षेला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामधून एकूण 31,061 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या शैक्षणिक जिल्ह्यात येणार्‍या सात ठिकाणांमध्ये परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. 

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 468 शाळा असून 104 परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.  संवेदनशील 68 शाळा असून अतिसंवेदनशील 36 शाळांची संख्या आहे. या सर्व परीक्षा केंद्रांमधील 104 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेे आहेत. त्यामुळे बाहेरून कॉपी देण्याबरोरच परीक्षा केंद्रामध्ये कॉपी देण्याबरोबर प्रश्‍नांची उत्तरे सांगणार्‍या पर्यवेक्षक आणि शिक्षकांनाही चाप बसणार आहे. 

आगामी 10 वी परीक्षेमध्ये बैलहोंगल तालुक्यामध्ये 3805, खानापूर तालक्यात 3762, बेळगाव तालुक्यात 8656, बेळगाव ग्रामीण 5408, सौंदत्ती 4336, रामदुर्ग 3327, कित्तूर 1767 असे एकूण 31061 परीक्षार्थी 10 वीची परीक्षा देणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच बाह्य परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. याशिवाय अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीही कमी संख्येने परीक्षा देत आहेत. 
येत्या एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेबु्रवारी किंवा मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. शिक्षण खात्याने यापूर्वी दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तरीही परीक्षा केंव्हा होईल याचा नेम नसल्याने बेळगाव जिल्हा शैक्षणिक खात्याने संपूर्ण तयारी केली आहे.