Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Belgaon › बेळगाव जिल्हा होणार हागणदारीमुक्त

बेळगाव जिल्हा होणार हागणदारीमुक्त

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:30AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियांनातर्गत बेळगाव जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. यासाठी येत्या मार्च महिन्यापर्यंत दीड लाख शौचालय उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून यासाठी जिल्हा पंचायतने कंबर कसली आहे. जिल्हा हागणदारीमुुक्तीसाठी 2012 पासून शौचालय उभारणी अभियान राबविण्यात येत आहे. ‘घर तेथे शौचालय’ उभारणीची चळवळ गतीमान केली आहे. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट रेंगाळले आहे. यावेळी मात्र प्रशासनाने मार्च महिन्यापर्यंत  जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे.

जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान 2012 साली सुरू करण्यात आले. त्यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 6.50 लाख कुटुंबाची होती. त्यापैकी 5.20 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून प्रातर्विधीसाठी मोकळ्या रानाचा आसरा घेण्यात येत असे. यामुळे स्वच्छ भारत अभियान गतिमान करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2014 पासून जिल्ह्यात 3.58 कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालये उभारण्यात आली. यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. त्याचा लाभ घेऊन शौचालय चळवळ काही प्रमाणात यशस्वी ठरली. परंतु अद्याप 1.62 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. यामुळे जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा आखला असून त्यामाध्यमातून जिल्हा हागण दारीमुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

येत्या तीन महिन्यात 1.50 लाख शौचालय उभारणीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून त्यानुसार अधिकारी कामाला लागले आहेत. सध्या जिल्ह्यातील खानापूर, तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले आहेत. जि. पं. अधिकार्‍यांना ग्रा. पं. अधिकार्‍यांना कार्यक्षेत्रातील शौचालयाविना असणार्‍या कुटुंबाची माहिती जमा करण्याचे आदेेश दिले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करून अधिकार्‍याना माहिती पुरविली जाणार आहे. बेळगाव जिल्हा भौगोलिक विस्तारदृष्ट्या राज्यात सर्वाधिक मोठा आहे. यामुळे या भागात मोहीम यशस्वी करण्यात अडथळा निर्माण होत असून त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियान जोमाने राबविण्यात येणार आहे.