Thu, Sep 20, 2018 08:59



होमपेज › Belgaon › बेळगावजवळ अपघात, युवक ठार

बेळगावजवळ अपघात, युवक ठार

Published On: Jan 25 2018 3:09PM | Last Updated: Jan 25 2018 3:09PM



बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-बागलकोट मार्गावर टेम्‍पो व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्‍वार ठार झाला. हा अपघात बुधवारी मध्यरात्रीनंतर झाला. यामध्ये राजेश कृष्णा पाटील (वय २१) या युवकाचा मृत्यू झाला. होनागा येथून मुतगा येथे परतत असताना हा अपघात झाला. करडीगुद्दीहून येणार्‍या टेम्‍पोने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाल्याने त्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना राजेशचा मृत्यू झाला.

उत्तर विभाग पोलिस स्‍थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.