Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Belgaon › हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

Published On: Sep 02 2018 1:10AM | Last Updated: Sep 01 2018 10:46PMबेळगाव : प्रतिनिधी

सनातनवरील  बंदीचा प्रयत्न हे षडयंत्र आहे, असा आरोप करत शनिवारी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारल्याने मोर्चा रद्द करुन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सुधीर हेरेकर यांनी केले. 

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार गौरी लंकेशसह अनेकांच्या हत्यामध्ये सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याची नावे घेण्यात येत आहेत. याबाबत कोणतेही पुरावे नसताना सनातन संस्थेची बदनामी करण्यात येत आहे. काही जणांकडून जाणीवपूर्वक सनातन संस्थेची बदनामी करुन बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यांचा अपप्रचाराला प्रशासन किंवा राज्य शासनाने बळी पडू नये.या हत्याकांडाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. धनंजय जाधव, संजय रायकर,विजय माळगे, मारुती सुतार, ऋषीकेश गुर्जर, नरेश शिंदे,बापू शिंदे, आयुष अनगोलकर, विजय नाडगोडकर आदी उपस्थित होते.