Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Belgaon › बेळगावच्या कुटुंबाला निपाणीजवळ अपघात

बेळगावच्या कुटुंबाला निपाणीजवळ अपघात

Published On: Apr 11 2018 1:40AM | Last Updated: Apr 11 2018 1:40AMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामागार्वर तवंदी घाटाक चिंदीपीर दर्गाहसमोर ट्रॅक्टरला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेळगावच्या कुटुंबातील सहाजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. 

संतोष अणवेकर, सोनिया संतोष अणवेकर (वय 35), शारदा मंजुनाथ अणवेकर (66), दत्तात्रय नार्वेकर (72), शुभांगी दत्तात्रय नार्वेकर (65),  किशोरी (6), वन्शिका (वय 2) सर्व जण रा. संभाजीनगर वडगाव-बेळगाव अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारी म. गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टरचालक सत्याप्पा दुंडाप्पा मलकेरी (वय 48, रा. कणगला) हाही जखमी आहे. 

 ट्रॅक्टर उतारावर असताना चालकाने अचानक बे्रक लावला. त्यावेळी बेळगावहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारने ट्रॅक्टरला मागून जोरात धडक बसली. त्याबरोबर ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला. जखमींना पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Tags :belgaons family accident near nipani belgaon news