Tue, Jul 16, 2019 01:53होमपेज › Belgaon › बेळगावसह पाच जिल्ह्यांत पुन्हा भूमापन होणार

बेळगावसह पाच जिल्ह्यांत पुन्हा भूमापन होणार

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 10:50PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावसह कारवार, हासन, रामनगर, तुमकूर या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा भूमापन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी कळविले आहे.  केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँक रेकॉर्डस् मॉडर्नायझेशन प्रोग्राम (डीआयएलआरएमसी) अंतर्गत 24 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत सध्या खात्यामध्ये उपलब्ध असणार्‍या जुन्या कागदपत्रांत दुरूस्ती करण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्र हे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली होती. 14 जिल्ह्यांतील 27 गावांमध्ये खासगी संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर भूमापन कार्य झालेआहे.

संगणकीकृत पाहणीपत्रात काही चुका आहेत. त्या दुरूस्त करण्यासाठी बंगळूर शहर जिल्हा वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये महसूल अदालत भरविण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांमधील गावातील तलाठ्यांना पाहणीपत्रातील चुका दुरूस्त करण्याची सूचना देण्यात आली आहे.