Tue, Oct 22, 2019 01:44होमपेज › Belgaon › विजापूर घटनेचा श्रीरामसेनेकडून निषेध

विजापूर घटनेचा श्रीरामसेनेकडून निषेध

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:21AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

विजापूर  येथे  शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करून खून करण्यात आला आहे. या घटनेचा श्री रामसेनेतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. आरोपींचा त्वरित शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी श्रीरामसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

विजापूर येथील विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार मानवतेला काळीमा फासणारा आहे. तिचा खून करण्यात आला. यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडविली जात आहे. याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. श्रीरामसेना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

तीन दिवसांपासून शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन झेडले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्‍यांना थकित बिले देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

याविरोधात शेतकरी संघटनेने आंदोलन हाती घेतले आहे. प्रशासनाने त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला श्रीरामसेनेचा संपूर्ण  पाठिंबा असल्याचे आश्‍वासन कोंडुसकर यांनी दिले. रवी कोकितकर यांच्यासह कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.