Sun, Apr 21, 2019 06:34होमपेज › Belgaon › गायब नाला पूर्ववत करून देण्याचे आश्‍वासन

गायब नाला पूर्ववत करून देण्याचे आश्‍वासन

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 22 2018 10:23PMमच्छे : वार्ताहर 

झाडशहापूर येथील गायब करण्यात आलेला नाला पुन्हा खोदाई करून देण्याचे संबंधित मालकाने सरकारी अधिकारी आणि जि. पं. सदस्यांना सांगितले. त्यामुळे गावकर्‍यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. झाडशहापूर गावच्या पूर्वेकडील भागात बेळगाव येथील एका सावकाराने 7 एकर जमीन खरेदी केली आहे. याच जमिनीतून नाला वाहतो. मात्र, त्या सावकाराने एकाच रात्रीत जेसीबीच्या सहाय्याने नाला भरून गायब केला होता.

याबाबत ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी धाव घेेऊन काम थांबविण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधिताने माझ्या जमिनीत नालाच नाही, असे सांगितल्याने ग्रामस्थ संतप्‍त बनले होेते. याबाबत  पोलिस व वनाधिकार्‍यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देेऊन संबंधित मालकाला काम थांबविण्यास सांगितले. पण गावकर्‍यांनी आम्हाला नाला पूर्ववत पाहिजे, अशी मागणी केली.   त्यामुळे अखेर त्या जमीन मालकाने चूक कबूल करून पूर्ववत नाला व्यवस्थित बांधून देतो, असे सांगितले. यावेळी सीपीआय नारायणस्वामी, जि. पं.सदस्य रमेश गोरल, ग्रा.पं.सदस्य मल्लाप्पा मर्वे, मधू नंदिहळ्ळी, विष्णू नंदिहळ्ळी आदी उपस्थित  होते.